इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी 11 जानेवारीला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, इमाम वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापला वस्ती येथे दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका 56 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपींना अटक केली आहे नागपुरात खुणाचे सत्र सुरू असून निवडणुकीच्या तोंडावर दुसरा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे.