अकोल्याची प्रगती जगताप ही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचं प्रतीक ठरली आहे. वडिलांच्या निधनानंतर आणि गंभीर आजारावर मात करत तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वडील सुनील जगताप हे अकोला महापालिकेचे नगरसेवक होते. त्यांच्या निधनानंतरही प्रगतीने खचून न जाता स्वतःवर विश्वास ठेवत अभ्यास सुरू ठेवला. नोकरीसोबत दररोज ६ ते ८ तास अभ्यास करत तिने हे यश मिळवलं. आता ती यूपीएससीची तयारी करत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्या