रोहा: रोहा येथील काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश
Roha, Raigad | Oct 31, 2025 आज शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास रोहा येथे काँग्रेसचे नेते समीर सपकाळ, रोहा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रमेश साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी सर्व नवगतांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. असे खासदार सुनील तटकरे म्हणाले. पक्षाची विचारधारा आणि कार्यपद्धती यांपासून प्रेरित होऊन विविध क्षेत्रांतील मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. रोहा शहराच्या विकासासाठी आपण अनेक महत्वपूर्ण टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत. आगामी काळातही सततचा आणि शाश्वत विकास हेच आपले प्राधान्य राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.