अमळनेर शहरातील आंबेडकर चौकात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच एकाने डोक्यात काचेची चौकट टाकून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना बुधवार, ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी गुरुवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.