पालघर: विरार येथे फर्निचर दुकानाला लागली भीषण आग
विरार पूर्वेकडील आर के नगर परिसरात फर्निचर चे दुकाने आहेत. फर्निचरच्या एका दुकानाला अचानक भीषण आग लागली. दुकानात लाकूड आणि प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आणि आग सर्वत्र पसरू लागले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र फर्निचर दुकानातील साहित्य मुद्देमाल जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.