अंबड: धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुणगाव फाटा येथे शेतकऱ्यांचे भव्य रास्ता रोको
Ambad, Jalna | Oct 12, 2025 जालना जिल्हा प्रतिनिधी श्रीधर कापसे *धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुणगाव फाटा येथे शेतकऱ्यांचे भव्य रास्ता रोको आंदोलन* अंबड तालुक्यातील धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील दुणगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन छेडले. शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनामुळे तब्बल अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते तथा पंचायत स