जळगाव शहरापासून जवळ असलेल्या रायपूर फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजता घडली आहे. या संदर्भात गुरुवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.