पाटोदा पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेच्या छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरहून २५ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.बीड येथील रहिवासी रेश्मा महेश भांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती महेश भांगे, सासू-सासरे, दीर आणि दोन नंदा यांनी वारंवार पैशांची मागणी करून मानसिक त्रास दिला. मागणी पूर्ण न झाल्याने मारहाण करण्यात आली, तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे त्यांनी शनिवार दि 20 डिसेंबर