महाड: मनसे महाड शहर अध्यक्ष मारहाण प्रकरण : घटना निषेधार्ह, पोलिसांनी सखोल चौकशी करावी!” — खा. सुनील तटकरे
Mahad, Raigad | Nov 2, 2025 मनसे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या समर्थकांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केली आहे. या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, “देशपातळीवर आणि राज्यपातळीवर गुंडगिरीच्या प्रवृत्तीने हल्ले होणे हे कधीही निषेधार्ह आहे.