पनवेल: पालिकेच श्रद्ध घालूत कामोठे वासियांचं आंदोलन
पावसाळ्यात रस्त्यावरच डांबर वाहून गेल्याने श्राद्ध करून नागरिकांचा निषेध
Panvel, Raigad | Sep 21, 2025 पनवेल महापालिकेने कामोठे मधील रस्ते दुरुस्तीसाठी 10 कोटी खर्च केले तरी पहिल्या पावसात डांबर वाहून गेले. सर्वच राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थानी पालिकेला निवेदन दिले पण पालिका मात्र पाऊस कमी होण्याची वाट पाहत आहे. पावसामुळे रस्त्यावरील खडी आणि वाळू बाहेर पडून अनेक छोटे मोठे अपघात झालेत. तरीही पालिका याचे दायित्व घेण्यास तयार नाही. पालिकेच्या डिसाळ कारभारालला कंटाळून एकता सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वपीत्री अमावस्या निमित्त पालिकेचे श्राद्ध घेतले आणि 25 पैशाचा नैवेद्य ठेवला.