बारामती: कटफळ येथे डॉन असल्याचं सांगत बारामतीतील उद्योजकाकडून उकळले पैसे; तिघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक
Baramati, Pune | Oct 31, 2025 बारामती तालुक्यातील कटफळ येथे एका लहान उद्योजकाला डॉन असल्याचे सांगत वारंवार धमकावून 85 हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीची कारवाई केली असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.