धारूर: मुसळधार पावसामुळे वान नदीला पोराला सून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे
Dharur, Beed | Oct 29, 2025 रात्रीपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. या सततच्या पावसामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विशेषतः धारूर तालुक्यातील वान नदीला मोठा पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या गावातील रहिवाशांनी नदीच्या प्रवाहापासून दूर राहावे