माण: मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड शहरातील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची शनिवारी रात्री केली पाहणी
Man, Satara | Sep 28, 2025 माण तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे म्हसवड शहरात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाबरोबरच शहरातील अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून नागरी वस्तीत पाणी शिरले होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून नागरी वस्तीला भेट देऊन व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.