चांदणी चौक परिसरात दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका कारचालकाने रस्त्याच्या कडेला ऑर्डरची वाट पाहत उभ्या असलेल्या डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक दिली. प्रसाद दिलीप मिसाळ (वय २६) हा तरुण स्विगीची ऑर्डर मिळाल्याने आपली गाडी स्टँडला लावून थांबला होता. यावेळी भरधाव आलेल्या तेजस बाबुलाल चौधरी या कारचालकाने त्याला धडक दिली.