मागासवर्गिय घटकातील मुला मुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होत आहे. ग्रामीण भागातून मोठया प्रमाणात मुले व मुली शिक्षण घेण्यासाठी शहरात येतात. परंतु निवासाची व्यवस्था नसल्याने त्यांची कुचंबना होते तसेच त्यांना आर्थिक झळ देखील बसते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे वर्धेतील महादेवपुरा,नालवाडी येथे मुलींसाठी दोन तसेच सावंगी येथे मुलांसाठी एका वसतिगृहाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी शासनाने 74 कोटी 12 लक्ष 88 हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.