नागपूर ग्रामीण: पानटपरी फोडणाऱ्या तिघांना अटक; चोरीचा प्रयत्न फसला
कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पानटपरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना २४ एप्रिलच्या मध्यरात्री घडली.फिर्यादी शेख मुश्ताक शेख रुल मसुरी (वय ४५) यांची कोराडी परिसरातील 'वॉक कुलर'च्या मागे, बडवाईक इंजिनिअरिंग कंपनीजवळ 'जिलानी पान पॅलेस' नावाची टपरी आहे. २४ एप्रिलच्या रात्री ११ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले असता, त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीने फोन करून माहिती दिली की, काही चोर त्यांचे दुकान फोडत आहेत.