आज बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीदरम्यान आगामी निवडणुका, पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटनाची बांधणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. रोहेकरांनी दाखवलेला विश्वास आणि शहराचा झालेला विकास गेल्या १५ ते २० वर्षांत लोकांनी अनुभवला असून, त्यामुळे आगामी निवडणूक आपण पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला. आगामी निवडणुकीत यश संपादन करून टीका-टिप्पणी करणाऱ्यांना आपल्या कामातून चोख उत्तर देऊ, असा विश्वासही यावेळी व्यक्त झाला.