आष्टी तालुक्यातील अंभोरा-हिवरा रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या छातीत गोळी झाडल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे, तर मृतदेहाजवळच एक दुचाकी आणि विनापरवाना पिस्तूल आढळून आले आहे.ही खळबळजनक घटना शनिवारी अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत समोर आली. आष्टी तालुक्यातील वाघळुज येथील मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण (वय ३५) याचा मृतदेह अंभोरा-हिवरा रस्त्यावरील कच्या रस्त्यालगत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना दिसला.