जालना: नूतनवसाहत परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर आयुक्त अंजली शर्मा यांचा भाजप नगरसेवकांकडून सत्कार
Jalna, Jalna | May 14, 2026 जालना शहरातील नूतनवसाहत परिसरातील मच्छी मार्केट, मटण व चिकन दुकाने तसेच गरीब शाह बाजार आणि बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात आल्याने भाजपच्या नगरसेवकांच्या वतीने जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग देण्यात आला असून आयुक्त अंजली शर्मा या स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी करत आहेत. नूतनवसाहत भागातील मच्छी मार्केट, मटण व चिकन दुकाने हटविण्याची कारवाई तसेच गरीब