महिलेची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका सराइताविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाघू तुकाराम हळंदे (रा. वारजे) याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.