शहरात गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले असून, यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजरी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानातील माल चोरी करणाऱ्या चोरट्यांना हटकले असता, त्यांनी एका तरुणावर तलवार आणि लाकडी दांडक्यांनी भीषण हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.