मनोरा: तालुक्यातील वरोरा ते धानोरा रस्ते बांधकाम निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार
Manora, Washim | Jun 21, 2025 पावसाळा तोंडावर असताना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन रस्ते बांधकाम व रस्ता दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. तथापि, गावकऱ्यांच्या निरीक्षणानुसार, या कामांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. या कामांमध्ये वापरलेले साहित्य तसेच कामाची पद्धत ठरवलेल्या अंदाजपत्रकानुसार नाहीत. यामुळे या रस्त्यांच्या टिकाऊपणाबाबत शंका निर्माण झाली आहे. नियमित निरीक्षणांअभावी आणि गुणवत्तेची तपासणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे.