उत्तर सोलापूर: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे: बंजारा समाजाचे नेते युवराज राठोड...
बंजारा समाजाच्या प्रतिनिधींनीमंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सोलापुरात हजारो लोकांसह जोरदार मोर्चा काढून ST (अनुसूचित जमाती) आरक्षणाची मागणी केली आहे. बंजारा समाजाचे नेते युवराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाने शासनासमोर ठळकपणे आपली मागणी मांडली. समाजजनांनी सरकारवर दबाव वाढवत बंजारा समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून ST आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मोर्च्यात विविध भागातील समाज नेते व नागरिक उपस्थित होते.