जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २५ संघांनी सहभाग घेतला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पर्धेस भेट सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तसेच शालेय शिक्षण व जीवनातील खेळाचे महत्त्व विशद केले.