नांदेड: काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण ऊपोषण;पुरग्रस्तांना आर्थिक मदत तत्काळ देण्याची केली मागणी
Nanded, Nanded | Nov 3, 2025 आज सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर काॅंग्रेस पक्षाच्या माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक यांनी आजपासून आमरण ऊपोषण सुरू केले आहे, या उपोषणातील प्रमुख मागणी म्हणजे नांदेड शहरात मागच्या महिन्यात आलेल्या महापुरामध्ये झालेल्या पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करून त्वरित आर्थिक मदत वितरण न केल्यामुळे आजपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी नगरसेवकांचे आमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती माजी उपमहापौर अब्दुल गफार यांनी आज दुपारी दिली आहे.