साक्री: अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात;राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची पिंपळनेर येथे निवेदनाद्वारे मागणी
Sakri, Dhule | Oct 27, 2025 साक्री तालुक्यासह अनेक भागांत गेल्या दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान माजवला आहे. शेतातील कांदा,कांद्याच्या रोपांसह सोयाबीन, मका आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेताला नदीचे रूप प्राप्त झाले आहे.त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. आधीच उत्पादनखर्चात भरमसाट वाढ, बाजारभावातील चढ-उतार आणि मागील हंगामात झालेला तोटा यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता निसर्गाचा आणखी एक घाव बसला आहे.