परळी: बिल देण्याच्या कारणावरून आईस्क्रीम विक्रेत्यास राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे मारहाण, सीसीटीव्ही व्हिडिओ सर्वत्र व्हायरल
Parli, Beed | Oct 12, 2025 परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात असलेल्या भोलेनाथ आईस्क्रीम सेंटर येथे बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका आईस्क्रीम विक्रेत्याला काही युवकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही युवक आईस्क्रीम खाण्यासाठी भोलेनाथ आईस्क्रीम सेंटरवर आले होते.