चंद्रपूर: तरूणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून ;
जिल्ह्यातील मोहाळी येथील घटना
जिल्ह्यातील मोहाळी गावात मध्यरात्री झालेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. राजू आनंदराव सिडाम (वय ३५, रा. मोहाळी) याचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. ही घटना आज दि.१९ सप्टेंबर ला सकाळी ८ वाजता उघडकीस आल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू सिडाम हा घरी एकटा असताना अज्ञात इसम मध्यरात्री त्याच्या घरी गेला. त्यानंतर त्याने गळा कापून त्याचा खून केला.