शेगाव: चिंचोली येथे तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकावर गुन्हा दाखल
चिंचोली येथे तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकावर १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोना रमेश गावर्धन बोदडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे चिंचोली येथे छापा टाकून विकेश गणेश बाभुळकर वय 27 वर्ष रा चिंचोली यास पकडले. पोलिसांनी याच्याकडून १९७ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जन्य मुद्देमाल जप्त केला.