दर्यापूर: गोळेगाव जवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात;२ मोटर सायकलस्वारांचा जागीच मृत्यू
दर्यापूर ते अकोला मार्गावर गोळेगाव फाटा जवळ आज दुपारी सुमारे १२:३० वाजता दोन मोटरसायकलींची अमोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.या अपघातात दोन्ही मोटरसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एम एच २७ डीबी ८९१९ व एम एच २७ डीजे १७२७ या दोन दुचाकी अमोरासमोर येवून धडकल्याने हा भीषण अपघात घडला,अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गणेश पांडुरंग राठोड,रा.टाकूनपुरा,ता.दर्यापूर,मंगेश जायले,रा. अमरावती असे मृतकांची नावे आहेत.