मोखाडा: ईदगाह परिसरात रमजान ईद साजरी;पोलीस बांधव व मान्यवरांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
मोखाडा तालुक्यातील ईदगाह परिसरात रमझान ईद अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक समाजाचे पठण केले. यावेळी पोलीस बांधव व परिसरातील मान्यवरांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या हिंदू- मुस्लिम एकता सामाजिक एकोपा, शांततेचा संदेश या रमजान ईद च्या माध्यमातून देण्यात आला.