पवनी: नगरपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; काँग्रेसच्या माजी महिला महासचिव माधुरी तलमले यांचा राष्ट्रवादीत (श.प.) प्रवेश
Pauni, Bhandara | Nov 10, 2025 पवनी शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या आणि उच्चशिक्षित असलेल्या माधुरी विजय तलमले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षात सन्मानपूर्वक प्रवेश केला. पवनी शहरातील 'नवसंकल्प बहुउद्देशीय संस्था'च्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे समाजकार्य केले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पवनी नगरपरिषद निवडणुकीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. माधुरी तलमले या NCP च्या शहराध्यक्ष, काँग्रेस महिला आघाडीच्या माजी महासचिव, पवनी नागरिक संघर्ष समितीच्या म