मारेगाव: क्षुल्लक वादातून जातीवाचक शिवीगाळ बाप लेकावर मारेगाव पोलिसांत गुन्हा दाखल शहरांतील घोसा रोडवरील घटना
शुल्लक वाद वाढून मारहाण व जातीय शिविगाळ करण्यापर्यंत पोहोचला. एका खाजगी व्यवसायिकावर थापडबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मारेगाव येथील घोन्सा रोडवर रविवारी, 5 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी बापलेकावर ऍट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल केले आहे.