भंडारा जिल्ह्यातील येरली/पचारा रोडवरील जयदेव कटरे यांच्या घरासमोर दिनांक १६/११/२०२५ रोजी सकाळी ९:३० वा. दरम्यान एक भीषण अपघात झाला. मृतक ऋषभ अनिल घरडे (वय ३०, रा. नवीन कामठी, जि. नागपूर) हा एम.एच.३४/ए.एम.५०२९ क्रमांकाच्या चारचाकी कारमधून ड्रायव्हर सीटजवळ बसून येरली रोडने पचारा येथील कार्यक्रमासाठी जात असताना, येरली गावाजवळ अचानक एक सायकल समोर आली. सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने वाहनाचे संतुलन बिघडले आणि गाडी रस्त्याच्या खाली उतरून पाणी जाण्याच्या...