कराड: कराडमध्ये भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकत्र; यशवंत विकास व लोकशाही आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ
Karad, Satara | Nov 22, 2025 कराड नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येत यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीचा महाआघाडी रूपात प्रचाराचा शुभारंभ केला. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी सात वाजता कराड येथील दत्त चौकात या प्रचार मोहीमेची सुरुवात झाली. या वेळी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या आघाडीमार्फत कराड नगरपालिका निवडणूक लढविण्याची भूमिका स्पष्ट केली.