जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणानदी पात्रात दोनगाव येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता समोर आली. याप्रकरणी गुरुवारी 4 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश रमेश पाटील रा. दोनगाव ता.धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.