परभणी: वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या फेसबुक आयडी बंद करून गुन्हे दाखल करा वंचितची पोलीस अधीक्षकांना मागणी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शुक्रवार 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 30 वाजता पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर करण्यात आलेल्या अपमानास्पद, द्वेषजनक व दिशाभूल करणाऱ्या विधानांबाबत संबंधित फेसबुक पेज आयडी तात्काळ बंद करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.