वडवणी: मुंडे आत्महत्यानंतर महाराष्ट्रातील नोकरी करणाऱ्या महिला सुरक्षित नाहीत हे सिद्ध, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
Wadwani, Beed | Oct 29, 2025 यावेळी माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या इतिहासाला लाज आणणारी आहे. आज महाराष्ट्रात काम करणाऱ्या महिला आणि मुली सुरक्षित नाहीत, हे या घटनेतून स्पष्ट दिसून येते. एवढी गंभीर घटना घडूनही राज्याचे मुख्यमंत्री या प्रकरणातील आरोपींना क्लीन चीट देतात, ही बाब अत्यंत चिंताजनक आणि अन्यायकारक आहे.” सपकाळ यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून न्