8 जानेवारीला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 'रायझिंग डे सप्ताह' निमित्त कपिलनगर पोलिसांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी शोधून काढलेले ९ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकूण ५३ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना नुकतेच सुपूर्द करण्यात आले.पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांच्या हस्ते हा मोबाईल हस्तांतरण सोहळा पार पडला. हरवलेला मौल्यवान मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून, ही नवीन वर्षाची एक सुखद भेट असल्याची भावना व्यक्त केली. ही कारवाई