शहापूर: बाईच्या बाई पणाचे धिंडवडे काढले तर आम्ही कधीच खपवून घेणार नाहीत : भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ संतप्त
Shahapur, Thane | Jul 10, 2025 शहापूर मधील एका शाळेमध्ये शाळेतील विद्यार्थिनीनां मासिक पाळीच्या नावाखाली विवस्त्र करून त्यांची तपासणी करण्याचा संताप जनक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. ही घटना अत्यंत निषेधार्य असून याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत. कारण बाईच्या बालपणाचे धिंडवडे काढले तर आम्ही कधीही खपवून घेणार नाहीत तशी संतप्त प्रतिक्रिया अधिवेशना दरम्यान भाजप आमदार तथा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली आहे.