शिंदखेडा: बाबळे फाट्याजवळ मोटरसायकलचा भीषण अपघात एक जण गंभीर जखमी शिंदखेडा पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
शिंदखेडा तालुक्यातील बाबळे गावाजवळ मोटरसायकलचा अपघात. नंदलाल आत्माराम पाटील वय 66 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी बाबळे फाटा जवळून सारवे गावाकडे दूध घेऊन जात असताना मागून येणारी बोलेरो गाडी क्रमांक एम एच 02 डी डब्ल्यू 47 33 वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहन भरगाव वेगाने चालत असताना त्याने मागून मला धडक दिली. यात मी गंभीर झालो यावरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.