समुद्रपूर: गिरड येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आली शिवसंदेश विश्वशांती शोभायात्रा
गिरड येथिल प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या सेंटरच्या वतीने रमादीदी, किरण दिदी यांच्या मार्गदर्शनात महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या औचित्याने विश्वशांती करीता शिव संदेश शोभायात्रेचे आयोजित करण्यात आले होते यावेळी सेंटर वरून गावातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत शोभा यात्रेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना विनाशाची वेळ आली आहे, कलियुग जाणार आहे, सतीयुग येणार आहे, कल्याणाकारी शिव परमात्मा आहे, जबतक सुरज चांद रहेग तब तक शिव बाबा का नाम रहैगा असा संदेश देण्यात आला.