समुद्रपूर: पंचायत समिती सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेच्या तालुक्यातील शेकडो लाभार्थीना मंजुरीपत्राचे वितरण
समुद्रपूर तालुक्यातील २२८७ लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र ठरविण्यात आले असून १७०० लाभार्थींना पहिला हप्ता वितरण करण्यात आला आहे. यांच अनुषंगाने हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मंजुरी प्रमाणपत्राच्या वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किशोर दिघे,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.