आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला शासनाची त्वरित दाद मिळाली असून,मोरवा ते मोरवा विमानतळ मार्ग सुधारण्यासाठी तब्बल ६ कोटींचा निधी आज दि 11 डिसेंम्बर ला सायंकाळला मंजूर झाला आहे. मोरवा-विमानतळ हा महत्त्वाचा मार्ग आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार होणार आहे.मोरवा विमानतळ परिसरात DGCA-अनुमोदित उडान क्लबचे प्रशिक्षण सुरू असल्याने या रस्त्याचे उन्नतीकरण अत्यंत आवश्यक होते.