नाशिक: कथक अभिव्यक्तीने नाशिककर रसिकांना मंत्रमुग्ध केले..
Nashik, Nashik | Sep 16, 2025 नाशिकमधील कलानंद कथक नृत्य संस्था हिचा वार्षिक कार्यक्रम ‘कथक अभिव्यक्ती’ कालिदास कला मंदिरात दिमाखात साजरा झाला. यावर्षी कलानंद आपल्या ४६व्या वर्षात पदार्पण करत असून या प्रवासाचा हा सोहळा नृत्य व सुरेल संगीताने उजळून निघाला. यावेळी नाशिककरांनी या वार्षिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.