धामणगाव रेल्वे: जुना धामणगाव येथे सोन्याचे दागिने नगदी व दोन मोबाईल असा 93000 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला लंपास
अविनाश मनोहर धोटे यांनी दत्तापूर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली आहे .अविनाश ची पत्नी किचनमध्ये स्वयंपाक करीत होती व अविनाश जेवण करीत होता .त्यादरम्यान अविनाश च्या पत्नीच्या पर्समध्ये असलेल्या 11 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे किंमत 80 हजार रुपये , 5000 रुपये नगदी व जुने वापरते दोन मोबाईल अंदाजे किंमत आठ हजार रुपये असे कोणीतरी 93 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तेव्हा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.