किनवट: आ. केराम यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेत किनवट येथे सोयाबीन खरेदी केंद्र चालु करण्याची केली मागणी
Kinwat, Nanded | Oct 30, 2025 किनवटचे आमदार भीमराव केराव यांनी क दर्जाच्या किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती साठी सोयाबीन खरेदी केंद्र चालू करण्याची मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमारजी रावल यांची मुंबई मंत्रालय येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडत किनवट येथे सोयाबीन खरेदी चालू करण्याचे अधिकार मिळावे असे निवेदन देत मागणी केले असल्याची माहिती आजरोजी दुपारी 3 च्या सुमारास आ. केराम यांच्या संपर्क कार्यालय येथून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदरची माहिती देण्यात आली आहे