उल्हासनगर: भर रस्त्यात माजी नगरसेवकावर केला होता हल्ला, सीसीटीव्हीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या
उल्हासनगरच्या श्रीराम चौक येथे मागील काही दिवसापूर्वी माजी नगरसेवक तुलसी बसिता यांच्यावर एका आरोपीने धारदार शस्त्राने भर रस्त्यात हल्ला केला होता. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यानंतर माजी नगरसेवक वसिटा यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे काल आरोपीला बेड्या ठोकल्या असून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.