गोंदिया: गौतमनगरातील किराणा दुकानावर छापा
- तंबाखूजन्य पदार्थ केले जप्त : शहर पोलिसांची कारवाई
Gondiya, Gondia | Jan 12, 2026 शहरातील गौतमनगर परिसरात अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने किराणा दुकानावर धाड टाकली. रविवारी (दि. ११) सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहे. गौतमनगर परिसरातील किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती