जालन्यात होळी, रंगोत्सव साजरा करताना वीज सुरक्षेबाबत खबरदारी घ्या जालना येथील महावितरण कार्यालयाचे नागरिकांना आवाहन… आज दिनांक दोन सोमवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात होळी व रंगोत्सव साजरा करताना वीज सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन जालना येथील महावितरण कार्यालयाने नागरिकांना केले आहे. होळी व धूलिवंदन हा वसंत ऋतूचा स्वागतोत्सव आहे. होळी पेटवताना व रंगांची उधळण करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सणाचा आनंद द्विगुणित करावा, अस